ज्यांनी प्रश्न बदलले त्यांना मी कुठून आलोय हे माहित नाही म्हणत फडणवीस यांचा पलटवार

सोमवार, 14 मार्च 2022 (15:09 IST)
पोलिसांनी याआधी मला नोटीस पाठविल्या होत्या हे खरंय. त्या नोटिसांना मी उत्तर देणार असं आधीच सांगितलं. पण, आधी पाठविण्यात आली प्रश्नावली आणि कालचे प्रश्न यात बराच फरक होता. 
 
काल विचारण्यात आलेल्या प्रश्नात सिक्रेट ऑफिशिअल कायद्याचा भंग करत आहेत का? असे प्रश्न विचारण्यात आले. हे प्रश्न कुठे आणि कुणी बदलले हे मला माहित आहे. पण, ज्यांनी प्रश्न बदलले त्यांना मी कुठून आलोय हे माहित नाही असा पलटवार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.
 
 मला गुन्हेगार असल्यासारखे प्रश्न विचारण्यात आले. मात्र, मी काही उत्तर दिले नाही. कारण मी ही वकील आहे आणि असलेली माहिती मी सीबीआयकडे देणार आहे.  माझे वडील, मझुन काकू निर्दोष असताना त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आले होते. पण, आम्ही घाबरणारे नाही. संघर्ष आमच्या घरातच आहे. त्यामुळे आम्ही शेवटपर्यत कायदेशीर लढाई लढू, भ्रष्टाचाराच्या विरोधात भूमिका मांडत राहणार असे देवेंद्र  फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती