गेल्या दोन दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट

सोमवार, 14 मार्च 2022 (12:42 IST)
गेल्या दोन दिवसांपासून  महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. विदर्भ, खानदेश, सोलापूर, नांदेड, परभणीसह मुंबई परिसरात तसंच पणजीमध्येही पारा नेहमीपेक्षा जास्त वर चढताना दिसतो आहे.
 
विशेषतः मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
 
मुंबईमध्ये तापमान पारा 39 अंश सेल्सियसवर जाईल आणि पुढचे दोन दिवस अशी स्थिती राहील, असा अंदाज हवामानतज्ज्ञ आणि भारतीय हवामान खात्याचे पुण्यातले प्रमुख के. एस. होसळीकर यांनी ट्वीटरवर मांडला आहे.
 
होसळीकर यांनी म्हटलं आहे की लोकांनी घाबरू नये, पण काळजी घ्यावी आणि गरज नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणं, उन्हात फिरणं टाळावं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती