'त्या' जिलेटिनच्या कांड्या नागपूरच्या सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत तयार झाल्या

शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (17:07 IST)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटके नागपूरची असल्याचे उजेडात आले आहे. स्फोटके असलेली कार तेथे सोडणारांची कसून चौकशी केली जात आहे. त्यासाठी अवघी तपास यंत्रणा कामी लागली आहे. वाहनातून जप्त करण्यात आलेल्या जिलेटिनच्या कांड्या नागपूर (बाजारगाव)च्या सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत तयार झाल्याचे तपासात उघड झाले आहे. 
 
“२००८ च्या नियमानुसार, केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री अँड पेट्रोलियम ऑफ सेफ्टी (पेसो) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार, कंपनीत उत्पादित केल्या जाणाऱ्या प्रत्येक स्फोटकाच्या उत्पादन आणि खरेदी- विक्रीची माहिती या विभागाच्या पोर्टलवर नोंदवली जाते. अधिकृत परवानाधारक कंपन्यांनाच कंपनीतून हे स्फोटक दिली जातात. त्याची माहिती पोलिसांनाही दिली जाते. स्फोटके ज्या पेटीत (बॉक्स) दिली जातात. त्यावर एक बारकोड असते. त्यावरून ही स्फोटके कुठून कुठपर्यंत पोहचली. ते सर्व कळते असे  सोलर कंपनी प्रशासनाने सांगितले आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती