Mahindra Scorpio खरेदी करणे महाग होईल, कंपनीने SUV ची किंमत वाढविली

शनिवार, 30 जानेवारी 2021 (13:20 IST)
भारताची आघाडीची स्पोर्ट्स युटिलिटी वाहन निर्माता कंपनी महिंद्रा आपल्या लोकप्रिय स्कॉर्पिओ एसयूव्हीच्या किंमती वाढवणार आहे. स्कॉर्पिओ एसयूव्हीच्या सर्व वेरिएंटमध्ये किंमतवाढ केली जात आहे. असे सांगितले जात आहे की सर्व महिंद्रा एसयूव्ही सुमारे 26,000 रुपयांनी महाग झाल्या आहेत, पूर्वी ही एसयूव्ही 12.42 लाख ते 16.27 लाख रुपयांदरम्यान उपलब्ध होती. परंतु आता त्याची किंमत 12.68 लाख ते 16.53 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
  
चार वेरिएंटमध्ये उपलब्ध महिंद्रा स्कॉर्पिओ-
Mahindra Scorpio एस 5, एस 7, एस 9 आणि एस 11 यासह चार प्रकारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. फक्त किंमतींशिवाय या एसयूव्हीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. कंपनी त्यांचे सर्व प्रकार अपडेट करीत आहे. अलीकडेच, महिंद्रा स्कॉर्पिओची अपडेट वर्जनला चाचणी दरम्यान स्पॉट करण्यात आले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती