राज ठाकरे यांची चौकशी नाही तर मनसे कार्यकर्ता चौगुले आत्महत्या करण्या मागचे हे आहे कारण

बुधवार, 21 ऑगस्ट 2019 (16:20 IST)
सध्या राज ठाकरे यांच्या ईडी चौकशी मुळे राज्याचे वातावरण तापले आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्याच्या कारणामुळे ठाण्यातील एका मनसे कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याचं वृत्त पसरले आहे. प्रवीण चौगुले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मात्र  प्रवीणच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी त्याच्या पार्श्वभूमीचा खरा तपशील दिला आहे. 
 
पोलीस अतिरिक्त आयुक्त प्रवीण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार मनसे कार्यकर्ता प्रवीण चौगुलेने या आगोदर तीन वेळा स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. २०१९ म्हणजेच याच वर्षीच मार्च आणि एप्रिल महिन्यात त्याने असा प्रयत्न केला होता. सोबतच पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार चौगुले मानसिकरित्या कमकुवत होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. सध्या पोलिसांनी शांततेचं आवाहन करत, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असं बजावलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती