चुकीच्या खात्यात पैसे ट्रांसफर झाल्यास लगेच हे करा...

अनेकदा लोकं ऑनलाईन पैसे ट्रांसफर करताना घाई-गडबडीत चुकीच्या खात्यात पैसे ट्रांसफर करून देतात. ऑफलाईन ट्रांसफर करताना देखील अशी चूक घडू शकते. अशात लोकं घाबरून जातात परंतू अशावेळी लवकरात लवकर पैसा वापर मिळावा यासाठी काय करावं हे जाणून घ्या- 
 
जसंच आपण पैसे ट्रांसफर केले तसेच संबंधित व्यक्तीकडून याबद्दल खात्री पटवून घ्या की त्याच्या खात्यात पैसे आले की नाही. जर त्याच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर आपण कोणत्या खात्यात पैसे ट्रांसफर केले आहे हे पुन्हा तपासून बघा. 
 
जर आपण चुकीच्या खात्यात पैसे ट्रांसफर केले असतील तर सर्वात आधी आपल्या बँकेला मेल करून घडलेल्या चुकीची माहिती द्या. बँकेला ट्रांजेक्शन संबंधित पूर्ण माहिती पुरवा. यात ट्रांजेक्शनची तारीख, वेळ, स्वत:चा अकाउंट नंबर आणि ज्या अकाउंट मध्ये चुकून पैसे ट्रांसफर झाले तो अकाउंट नंबर या सर्वांचा उल्लेख करा.
 
अशात अकाउंट नंबर चुकीचा असल्यास पैसे आपोआप खात्यात परत येतील. परंतू पैसे खात्यात आले नसतील तर ब्रांचमध्ये जाऊन ब्रांच मॅनेजरशी संपर्क करावा. पैसे कोणत्या खात्यात ट्रांसफर झाले हे माहीत करण्याचा प्रयत्न करा तसेच चुकीचं ट्रांजेक्शन आपल्याच बँकेच्या एखाद्या ब्रांचमध्ये झालं असल्यास पैसे आपल्या खात्यात सोप्या रित्या परत येतील. जर दुसर्‍या बँकेच्या खात्यात पैसे ट्रांसफर झाले असतील परत येण्यात अधिक वेळ लागू शकतो. 
 
अनेकदा बँकेच्या अशा प्रकरणात निकाल लागण्यात 2 महिने देखील लागून जातात. तथापि, आपण बँकेकडून कोणत्या शहराच्या कोणत्या ब्रांचच्या कोणत्या अकाउंटमध्ये पैसे ट्रांसफर झाले हे माहीत करू शकता. तसेच त्या ब्रांचमध्ये संपर्क साधून प्रयत्न करता येतील. 
 
आता प्रश्न येतो की पैसा ट्रांसफर झाल्यावर व्यक्तीने ते पैसे अकाउंटमधून काढून खर्च केले असतील तर काय? अशात बँक त्याच खातं तेवढे अमाउंटने लिन करेल आणि जसेच अकाउंटमध्ये पैसे येतील रक्कम आपल्या अकाउंटमध्ये ट्रांसफर करण्यात येईल.
 
RBI ने देखील बँकांना निर्देश दिले आहे की चुकीने पैसे दुसर्‍या खात्यात जमा झाल्यास बँकेने लवकरात लवकर पैसे परत करण्यासाठी प्रयत्न करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती