तृतीय पंथी सपना आणि बाळू लग्नाच्या बेडीत अडकले

सोमवार, 7 मार्च 2022 (18:45 IST)
असं म्हणतात की प्रेमाला काही लिंग, जात, धर्म, चे बंधन नाही. प्रेम हे देवा कडून दिलेली छानशी भेट आहे. खरं प्रेम असल्यावर कोणतेही बंधन मध्ये येत नाही. असेच काही घडले आहे बीड मध्ये. बीड मध्ये एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. आज तृतीयपंथी सपना आणि बाळू  धुताडमल हे दोघे एकमेकांसह लग्नाच्या बेडीत अडकले. 
 
त्यांचा विवाह आज बीड शहरातील कंकालेश्वर मंदिरात पार पडला. त्यांच्या या विवाह सोहळ्याला बीड जिल्ह्यातील गणमान्य नागरिकांसह इतर नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते. त्यांनी सर्वानी आपली उपस्थिती देऊन दोघांना शुभेच्छा दिल्या. 
 
काही दिवसांपासून त्यांच्या या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याबाबद्दल चर्चा होत होत्या. खरं तर जरी आज समाजात तृतीयपंथीय नागरिकांना काही अधिकार मिळाले असले तरी त्यांच्या कडे बघण्याच्या दृष्टीकोन आज देखील वेगळा आहे. अशा परिस्थितीत बीडच्या एका तरुणाने चक्क तृतीयपंथी सपनाशी लग्न करून आपल्या प्रेम कहाणीनी एक वेगळा संदेश समाजाला दिला आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती