राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

मंगळवार, 9 एप्रिल 2024 (15:54 IST)
राज्यात येत्या तीन दिवसांत पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली आहे. या मुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस किनारपट्टी वगळता राज्यात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. 

येत्या पाच दिवस राज्यभरात ढगाळ हवामान राहून कमाल तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमानात घट झाल्यामुळे कमाल तापमान कमी झाले आहे. सध्या काही ठिकाणी ढगाळ वातावरण झाले आहे त्यामुळे कमाल तापमान चाळीशीच्या खाली आले आहे.सोलापूरात तापमान 42 तर मालेगावात तापमान 41.8 अंश आहे. सध्या राज्यात सरासरी तापमान 35 ते 39 अंशावर आहे.विदर्भात तापमानात घट झाले आहे. किनारपट्टीवर पारा सरासरी 33.5 अंश सेल्सिअस आहे. 

 Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती