राज्यात कोरोना लसीकरणाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत : टोपे

मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (20:42 IST)
महाराष्ट्रात लसीकरणाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत, असा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. राज्यात सध्या आरोग्य ६५२ केंद्र असून लसीकरण आरोग्य विभाग ४ लाखांच्या आसपास आहेत. दररोज ५० हजारांपर्यंत लसीकरण होत आहे. आतापर्यंत सव्वा पाच लाख लसीकरण झाले आहे. लसीकरणाला विरोध नसून लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे सर्वांना लस घेण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. 
 
केंद्र सरकारची टीम राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आली होती. त्यावेळी काही जिल्ह्यांमध्ये रेट वाढत असल्याचे समोर आले. उदाहरणार्थ, अकोला, यवतमाळ, नंदुरबार, अमरावती, रत्नागिरी जिल्ह्यात रेट वाढ आहेत. त्याच दृष्टीकोनातून चर्चा केली गेली. जिथे सीएफआर म्हणजे केस फॅकल्टी रेट, स्टेट एव्हरेजपेक्षा जास्त आहे, त्या जिल्ह्याचा देखील अभ्यास केला. तर त्यामधून त्यांनी ज्या सूचना दिल्या होत्या, त्या आमच्या विभागाने मान्य केल्या आहेत आणि आमच्या विभागाने खात्री दिली आहे की, ‘हे आम्ही करू.’ 
 
पुढे टोपे म्हणाले की, कोरोना काळात आम्ही प्रामाणिकपणे काम केली आहेत. सर्व संस्थांच्या निर्देशांचे पालन केले. रुग्णांना चांगल्या आरोग्यसुविधा दिल्या. पण महाराष्ट्रात सर्वात जास्त नागरीकरण, असल्यामुळे कदाचित रुग्णसंख्या जास्त आहे. महाराष्ट्रापेक्षा गोवा, दिल्लीत जास्त केसेस आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती