म्हाडाच्या कोकण मंडळाच्या तब्बल ७५०० घरांसाठीची लॉटरी येत्या दिवसांमध्ये म्हाडाकडून काढण्यात येणार आहे. मुंबई महानगर क्षेत्राममध्ये ही घरे आहेत. खाजगी विकासकांच्या किंमतीपेक्षा स्वस्त दरात ही घरे उपलब्ध होणार आहेत. परवडणाऱ्या दरातील ही घरे असतील असा म्हाडाचा दावा आहे. मार्च अखेरीस म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी प्रक्रिया सुरू होईल असे म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाची घरे ही बहुतांशपणे ठाणे, कल्याण या मुंबई महानगर प्रदेशातच असणार आहेत. ठाण्यात भंडारली आणि गोटेघर येथील घरे लॉटरीसाठी उपलब्ध असतील. तर कल्याणमध्ये शिरडोने कोणी येथे ही घरे लॉटरी प्रक्रियेत उपलब्ध असणार आहेत. लॉटरी प्रक्रिया ही मार्चमध्ये सुरू होईल अपेक्षित आहे, तर मे मध्ये ही लॉटरी काढण्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेत मुंबईसाठीही घरांची लॉटरी लवकरच काढण्यात असल्याचे स्पष्ट केले होते. म्हाडाच्या ठाणे, कल्याण परिसरातील घरे ही आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी आणि कमी उत्पन्न गटासाठी उपलब्ध असणार आहेत.