लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता उदयनराजे भोसले यांना पुन्हा एकदा संसदेची दारे खुणावू लागली आहेत. या महिन्याच्या अखेरीस राज्यसभा सदस्यत्वासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उदयनराजे यांचेही नाव आहे. याशिवाय भाजपने महाराष्ट्रातून आरपीआय(ए)चे नेते रामदास आठवले यांनाही उमेदवारी दिली आहे.
26 मार्च रोजी होणार्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात मित्र पक्षांच्या दोन उमेदवारांसह एकूण 11 जणांची नावे आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांचेही नाव त्यात आहे. अशी आहे यादी भाजपने बुधवारी नऊ राज्यांमधील राज्यसभा उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये असाम (भुवनेश्वर कालीता), बिहार (विवेक ठाकूर), गुजरात (अभय भारद्वाज, रमीलाबेन बारा), झारखंड (दीपक प्रकाश), मणिपूर (लिएसेंबा महाराजा), मध्य प्रदेश (ज्योतिरादित्य शिंदे, हर्षसिंह चौहान), महाराष्ट्रातून (उदयनराजे भोसले, रामदास आठवले), राजस्थान (राजेंद्र गहलोत) यांचा समावेश आहे.