पोलिसांच्या माहितीनुसार, मृत तरुण त्याच्या मित्रांशी बोलत असताना आरोपी तिथे आला आणि त्याने त्याच्यावर अनेक वार केले आणि नंतर धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला. गंभीर जखमी अवस्थेत तरूणाला राजावाडी रुग्णालयात आणि नंतर सायन रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पळून गेला, परंतु पोलिसांनी त्याला अटक केली.