शाळेची घंटा वाजणार ! राज्यातील प्राथमिक शाळा सुरु होणार

बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (12:00 IST)
कोरोनाचे प्रकरण कमी झाले असले तरी अद्याप कोरोनाचे संकट टळले नाही .कोरोनाच्या पार्शवभूमीचा आढाव घेत येत्या 12 नोव्हेंबर पासून मुंबईसह राज्यातील शाळांमध्ये इयत्ता 3 ,5 ,8 आणि 10 चे वर्ग सुरु करणार आहेत. या साठी वर्गात शिक्षक आणि विद्यार्थ्यांची 100 टक्के उपस्थिती बंधनकारक आहे. येत्या 12 नोव्हेंबर रोजी एका दिवसासाठी इयत्ता तिसरी आणि पाचवी चे वर्ग भरणार आहे 12 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकार कडून संपूर्ण देशात एकाच वेळी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण होणार आहे यासाठी राज्यातील शाळेच्या दिवाळीच्या सुट्ट्याच्या पत्रकात फेर बदल करण्यात आला आहे . शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण साठी केली जाणारी पूर्व तयारी, आवश्यक अंमलबजावणी सूचना, त्यादिवशी काय काम करायचे त्याची माहिती , वेळा पत्रक सर्व शाळांमध्ये पाठविण्यात आले आहे. याचे नियम, आणि  नियमांचे पालन करण्याची माहिती आणि सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात अद्याप पहिली ते चवथी चे वर्ग सुरु केले नाहीत. तर शहरी विभागात अद्याप पहिली ते सातवीचे वर्ग सुरु केले नाही. तर या सर्वेक्षणासाठी ग्रामीण भागात तिसरी तर शहरी भागात तिसरी पाचवी च्या वर्गाचे पालक आपल्या पाल्याला पाठवणार का? विद्यार्थ्यांची हजेरी किती असणार त्यासाठी चे संमती पत्र पालकांकडून मागवायचे का ? असे प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाला पडले आहे.  विद्यार्थी आणि शिक्षकांची 199 टक्के उपस्थिती आवश्यक असण्याचा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.  
या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी केंद्रसरकार कडून मुंबईतील महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 140 शाळा आणि बृहन्मुंबई शहर व उपनगराच्या अंतर्गत येणाऱ्या 152 शाळांची निवड करण्यात आली आहे. या साठी शाळांमध्ये मुख्याध्यापक, विद्यार्थी , शिक्षक, इतर कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असणे बंधनकारक आहे. या साठी पालिका आयुक्ताने मंजुरी दिली आहे. या साठी विद्यार्थ्यांना शाळेत बोलवताना कोरोनाच्या नियमांचे पालन करणे बंधन कारक असेल. त्यासाठी शाळांनी विशेष दक्षता आणि काळजी घेण्याच्या सूचना राज्यातील शाळांना देण्यात आल्या आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती