एसटी महामंडळाकडून कारवाईला सुरुवात, 376 कर्मचाऱ्यांचं निलंबन

बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (09:18 IST)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं (MSRTC) राज्य शासनात विलीनीकरण करा, या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास MSRTC ने सुरुवात केली आहे.
 
ताज्या माहितीनुसार संपावर गेलेल्या 376 कर्मचाऱ्यांना MSRTC ने निलंबित केलं आहे. त्यामध्ये आगारातील 45 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कर्मचारी संपावर गेल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने एक समिती स्थापन करून त्यावर तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत. तर राज्य सरकारनेही यासंदर्भात शासननिर्णय काढला आहे, तरीही कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
 
दरम्यान, एसटी महामंडळ संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिकाही दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती