सर्टिफिकेटवरील फोटो तसाच राहिल परंतु आम्हाला स्वतंत्र अ‍ॅप तयार करु द्या : नवाब मलिक

शुक्रवार, 14 मे 2021 (07:54 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्रसरकारला वाटत असेल की, आम्ही सर्टिफिकेटवरील पंतप्रधानांचा फोटो हटवू पण आम्ही आश्वासन देतो की, सर्टिफिकेटवरील फोटो तसाच राहिल परंतु आम्हाला स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याची व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
 
कोविन अ‍ॅपवर रजिस्टर करून लस दिली जात आहे. परंतु हे अ‍ॅप वारंवार डाऊन होत आहे त्यामुळे रजिस्टर केलेल्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहेच शिवाय लोकांना रजिस्टर करायला अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे राज्यसरकारला हे अ‍ॅप तयार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. केंद्रसरकारने ही परवानगी दिली तर या अ‍ॅप आणि इतर माध्यमातून लोकांच्या नोंदी घेऊन लस देण्यात सुलभता येईल. परंतु केंद्रसरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही असेही नवाब मलिक म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती