दर्ग्यामध्ये भगवी शाल टाकून भिंतीवर ओम नमो: आदेश असा मजकूर लिहिला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन नंदकुमार पळशीकर (रा. भराडगल्ली, चितळे रोड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून त्याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.
पांढर्या रंगाच्या छोट्या दर्ग्याच्या दरवाजाला भगवा रंग देऊन नाथांचा फोटो लावल्याचे निदर्शनास आले. तसेच दर्ग्याच्या आत भगवी शाल टाकून भिंतीवर ओम नमो: आदेश असा मजकूर लिहिल्याचे आढळून आले. सचिन पळशीकर याने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे सचिन पळशीकर याला तोफखाना पोलिसांनी अटक केली.