पुढचे चार दिवस विदर्भासह मराठवाडाया भागात उष्णतेची लाट (heat wave) येणार असल्याचे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले होते. दरम्यान काल दिवसभरात विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट (heat wave) जाणवू लागली आहे. शनिवारी वर्धा जिल्ह्याचे तापमान सर्वाधिक नोंदववण्यात आले. वर्ध्याचे तापमान शनिवारी 46.5 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. मागील 24 तासांत तापमानात 2.5 अंशांची वाढ झाली आहे. तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक कमी 29.7 अंश तापमानाची नोंद झाली.
तज्ञानी म्हटले आहे की तीव्र उष्णतेने लहान मुले, वृद्ध आणि आजारांनी ग्रस्त लोकांसाठी आरोग्य सांभाळावे लागणार आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, या भागातील लोकांनी उष्णतेच्या लाटेच्या सामना करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. हलक्या रंगाचे सैल, सुती कपडे परिधान करावेत आणि डोक्याला कापड, टोपी किंवा छत्री इत्यादींनी झाकावे.पाणी भरपूर पिणे हे देखील त्यांनी सांगितलं आहे.