चोर आले 15 एकर ऊस पिंजून काढल्यावर पोलिसांना समजल की,...

सोमवार, 16 मे 2022 (15:26 IST)
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील चिखली गावात काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती. त्यानंतर चिखली, फुटाणा कान्हेगाव परिसरात रात्रीच्या वेळी चोर येत असल्याच्या बातम्या पसरत होत्या. या भागातील गावांमध्ये तरुणांनी रात्रीच्या वेळी पाहरा देण्यास सुरुवात केली. तर पोलिस  विभागाकडून देखील सतत या भागात फिरते पथक तैनात केले आहे.
 
 दुपारच्या सुमारास चिखली शिवरात ऊसाच्या फडात चोर लपून बसल्याची माहिती नागरिकांना मिळाली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी ऊसाच्या फडाकडे धाव घेत सदरील घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस पथकाने धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने भर उन्हात पंधरा एकर ऊसाचा फड पिंजून काढला. मात्र नंतर चोर आल्याची घटना ही अफवा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांना रिकाम्या हाताने माघारी परत यावं लागलं.
घटनेनंतर बाळापूर पोलीस स्थेशन चे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनपोड यांनी नागरिकांना घाबरून जाऊ नका तसेच अशा अफवांवर विस्वास ठेवु नका आव्हान केल आहे. यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती