रस्त्यांचं काम झाल्याशिवाय आंदोलन मागे नाही – नीलेश लंके

शनिवार, 10 डिसेंबर 2022 (09:20 IST)
नगर -पाथर्डी-शेवगाव, नगर -राहुरी- कोपरगाव व नगर-मिरजगाव ते चापडगाव टेंभुर्णी रस्त्याचे काम झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार आमदार नीलेश लंके यांनी केला. विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
 
नगर जिल्ह्यातील नगर- शिर्डी, नगर-पाथर्डी यासह इतर रस्त्यांची कामे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत. खराब रस्त्यामुळे अनेकांचे अपघातातबळी गेलेले आहेत. प्रशासन या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (7 डिसेंबर) उपोषण सुरू केले आहे. ही बातमी अॅग्रोवनने दिली.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती