‘...तर संजय राऊतांना महाराष्ट्रसैनिक सुरक्षा पुरवतील’

शनिवार, 10 डिसेंबर 2022 (08:39 IST)
शिल्लक सेनेत सगळे मर्द संपले असतील, तर संजय राऊत यांना महाराष्ट्र सैनिक छातीचा कोट करून सुरक्षा पुरवतील. मात्र चर्चेत राहण्यासाठी अशा कांड्या पिकवू नका, असं वक्तव्य मनसे नेते गजानन काळे यांनी केलं आहे.
 
कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने आपल्याला महाराष्ट्रात येऊन हल्ला करण्याची धमकी दिली आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.
 
त्यावर प्रतिक्रिया देताना काळे यांनी ट्वीट करून म्हटलं, “सौ. दाऊद ज्यांना घाबरतात त्यांना धमकी आल्याच कळतंय. काळजी नका करू सरकार संरक्षण देईलच पण जर शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना महाराष्ट्रसैनिक छातीचा कोट करून सुरक्षा पुरवतील. मात्र चर्चेत राहण्यासाठी अश्या काड्या पिकवू नका. खरंच यांना धमकी आली का पहावे सरकारने.” ही बातमी लोकमतने दिली.
Edited by : Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती