सरकारने खुशाल चौकशी करावी आणि एक महिन्यात निकाल लावावा, बावनकुळे यांची मागणी

बुधवार, 16 मार्च 2022 (21:17 IST)
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत आल्यापासून अडीच वर्षात चौकशी करावी असे वाटले नाही. पण आता महावितरणच्याच तीन विभाग संचालकांकडून चौकशी करुन काय मिळणार आहे? त्यासाठी त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी आणि एक महिन्यात निकाल लावावा अशी मागणी भाजप नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
 
ऊर्जा मंत्रीपदाच्या काळातील कामांची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यावर विधिमंडळाच्या परिसरात माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर बावनकुळेंनी निशाणा साधला आहे. महावितरणचे संचालक चौकशी कसे करणार आहेत, त्यासाठी समितीची व्याप्ती वाढवावी लागेल, त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी व त्याचा निकाल महिन्याभरात लावावा असे बावनकुळे म्हणाले आहेत.
 
चौकशीमागे खासगीकरणाचा वास येत असल्याचा संशय चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. चौकशीचा ठपका लावून अहवाल तयार करायचा आणि महाराष्ट्रातील १६ शहरांच्या खासगीकरणाचा घाट घालायचा असा यामागचा प्रयत्न असू शकतो असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती