मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले असताना, अशातच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरुन एकीकडे सुप्रीम कोर्टात मोठ्या घडामोडी घडत आहेत, तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्येही उलथापालथी होत आहेत. विधानसभा निवडणुकीला वर्ष बाकी असताना नेत्यांच्या पक्षबदलीला सुरुवात झाल्याची चित्र आहे. एकीकडे शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असताना, आता शिंदे गटाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
पांडुरंग बरोरा यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. शहापूरमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दौलत दरोडा आहेत. दौलत दरोडा हे अजित पवार गटात आहेत.त्यामुळे आता शहापूरमध्ये येत्या निवडणुकीत दौलत दरोडा यांच्यासमोर पांडुरंग बरोरा यांचं आव्हान उभं राहतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे.
कोण आहेत पांडुरंग बरोरा?
पांडुरंग बरोरा हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते विधानसभेवर गेले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. 1980 पासून पवार कुटुंबासोबत असलेल्या शहापूरमधील बरोरा कुटुंबाने पक्षासोबत फारकत घेतली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला होता. त्यावेळी शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बरोरा यांची जवळीक होती. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.