आरोग्य विभागाच्या गट क आणि ड या प्रवर्गातील परीक्षा २५ व २६ सप्टेंबर रोजी होणार

मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (08:26 IST)
महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड या प्रवर्गातील परीक्षा २५ व २६ सप्टेंबर रोजी होणार आहेत.या परीक्षेसाठी साधारणपणे गट क साठी एकूण २७४० एवढ्या जागा आपण भरत आहोत. गट ड साठी ३ हजार ५०० जागा आपण भरत आहोत.एकूण जवळपास ६ हजार २०० जागा आपण भरत आहोत.या जागांसाठी साधारणपणे एकूण आठ लाखांपेक्षा अर्ज देखील आले आहेत आणि हॉल तिकीट्स देण्यात आले आहेत.” अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 
 
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, “२५ आणि २६ रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी माझं सर्व परीक्षार्थ्यांना विनंती आहे, आवाहन आहे. आपले परीक्षा केंद्र लक्षात ठेवा. परीक्षा केंद्रावर करोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं पूर्णपणे पालन केले जाणार आहे.परीक्षा केंद्रावर जॅमर बसवले जाणार,त्यामुळे परीक्षा केंद्रावर कुठलही इलेक्ट्रिकल गॅझेट चालणार नाही.पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.राज्यभरातील पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आलेलं आहे की, आपल्या विभागातून उपजिल्हाधिकारी व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी परीक्षा केंद्रांवर सतत पेट्रोलिग करून, परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल याची दक्षता घेतील अशी अपेक्षा आहे.अत्यंत पारदर्शक परीक्षा घेतल्या जाणार आहेत.”
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती