आप'च्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आताची मोठी बातमी समोर येत आहे. काही वेळापूर्वी दिल्ली पोलिसांचे पथक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी बिभव कुमारला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून अटक केली आहे. स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्यावर मारहाण आणि गैरवर्तनाचा आरोप केला आहे. स्वाती मालीवाल यांनीही याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. एफआरआय दाखल झाल्यापासून दिल्ली पोलिस सतत बिभव कुमारचा शोध घेत होते.
अटकेनंतर दिल्ली पोलिसांनी बिभव कुमारला सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात नेले. अटकेपूर्वीच बिभव कुमारने एक मेल पाठवला होता, ज्यामध्ये त्याने प्रत्येक तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. बिभव कुमारने आपल्या मेलमध्ये लिहिले की, 'मी प्रत्येक तपासात सहकार्य करण्यास तयार आहे. एफआयआर नोंदवल्याची माहिती मला प्रसारमाध्यमांद्वारे मिळाली. एफआयआरनंतर मला आतापर्यंत कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. दिल्ली पोलिसांनीही माझ्या तक्रारीची दखल घ्यावी.