ठाकरे आणि राणे प्रथमच एकत्र येणार, होणार बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटन

सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (22:11 IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रथमच एकत्र येणार आहेत. चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयने परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी दिली.
 
यावेळी सामंत यांनी एमआयडीसी जो राजशिष्टाचार ठरवेल त्यानुसार आमंत्रणे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशांना देखील यावर्षी मान्यता मिळाली असून या शैक्षणिक वर्षात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचेही उदय सामंत यांनी जाहीर केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती