पबजीच्या नादात मुलाने घर सोडले

शुक्रवार, 6 मे 2022 (13:48 IST)
पबजी खेळण्याच्या नादात मुलांनी आपल्या आईवडिलांचे पैसे गमावल्याच्या बातम्या आपण ऐकल्याचं असतील किंवा पबजीमुळे मुलांनी जीव गमावल्याच्या घटना देखील ऐकल्या असतील आता पबजीमुळे 12 वर्षाचा मुलगा चक्क नांदेड हुन घर सोडल्याची घटना घडली आहे. नागेश माधवराज जाहुरे असे या मुलाचे नाव आहे. नागेश माधवराज हा बिलोरी तालुक्यातील हरनाळा येथील रहिवासी आहे. 
 
नागेश नावाचा मुलगा बुधवारी सकाळी अंगणात पबजी खेळत असता खेळण्याच्या नादात तो चक्क नांदेड रेल्वे स्थानकांवर पोहोचून थेट रेल्वेत बसला आणि चक्क रेल्वेने नाशिक रोड पोहोचला. तो खेळण्याच्या नादात एवढा गर्क होता की त्याला हे भानच राहिले नाही की आपण कुठं आहोत. इथे घरात तो कुठंही दिसला नाही तेव्हा त्याची शोधाशोध सुरु झाली. सर्व ठिकाणी शोधून देखील तो सापडला नाही तेव्हा तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली. पोलिसांनी त्याचे फोटो सर्वत्र पाठविले आणि अखेर नाशिक रोड पोलिसांना तपोवन एक्स्प्रेसमध्ये हा मुलगा सापडला. तो घाबरलेला होता. त्याला काहीच बोलता येईना ,सांगता येईना. काही तास उलटल्यावर त्यानी आपल्या बाबत माहिती पोलिसांना दिली. नंतर मुलाच्या घरी कळविण्यात आले. तो सुखरूप असल्याचे समजतातच कुटुंबाने सुटकेचा श्वास सोडला आणि त्याला घेऊन येण्यासाठी नाशिकरोड गाठले. त्याला भेटून कुटुंबियांना आनंद झाला. 
 
नागेश हा घरात सर्वांचा लाडका असल्यामुळे त्याला कोणीही काहीही करण्यापासून रोखत नवे. मोबाईलचा नाद देखील त्याला लॉक डाऊन मुळे लागला आहे. लॉक डाऊन काळात मुलांना जास्त प्रमाणात मोबाईल वापरावा लागत होता. त्यामुळे त्याला मोबाईलवर पबजी खेळण्याचा नाद लागला आणि त्यांनी चक्क पबजी खेळाच्या नादामुळे घर सोडले.     
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती