राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास स्थान मातोश्रीवर हनुमान चालिसाचं पठण करण्याचे सांगितल्यावर अमरावतीचे खासदार राणा राणा दाम्पत्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यावरून त्यांना तुरुंगात जावे लागले. राणा दांपत्याचा जामीन बुधवारी सत्र न्यायालयाने मंजूर केला असून त्यांना तुरूंगातून सोडण्यात आले आहे. न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची आदेशाची सविस्तर प्रत उपलब्ध झाली आहे. हे आदेश विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दिले आहे.
या आदेशात राणा दाम्पत्यांवर राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नसल्याचे म्हटले आहे. त्यांना मुंबई पोलिसांनी नोटीस दिल्यावर त्यांनी आपले आंदोलन माघारी घेतले असून ते आपल्या खारच्या घरातच होते तरीही त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हे चुकीचे असल्याचं कोर्टाने राज्य सरकारला म्हटलं आहे. राणा दाम्पत्याचं राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात व्यक्त केलेल्या भावना जरी आक्षेपार्ह असल्या तरीही त्यांनी राजद्रोह केल्याचा आरोप सिद्ध होत नाही. न्यायालयाने राणा दाम्पत्याची जामीन मंजूर करत राज्य सरकारला म्हटलं आहे.