मनसे प्रमुख राज ठाकरें विरुद्ध दुसरं अजामीनपात्र वॉरंट जारी

शुक्रवार, 6 मे 2022 (13:06 IST)
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होत आहे. सांगलीच्या शिराळा न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्या नंतर आता बीडच्या परळी न्यायालयाकडून देखील त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्याचे आदेश दिले आहे. 

जामीन मिळाल्यावर कोर्टात सतत गेयर हजर राहिल्यामुळे न्यायालयाकडून हा आदेश देण्यात आला आहे. कोर्टाने अजामीनपात्र वारंट 10 फेब्रुवारी ला काढलं होतं.त्यात 13 एप्रिल पर्यंत कोर्टात हजर राहण्यास सांगितलं होतं. राज ठाकरे हे 13 एप्रिल पर्यंत कोर्टात हजर न राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात दुसऱ्यांदा परळी कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जरी केलं आहे.   
 
 2008 मध्ये ठाकरे यांच्या समर्थनार्थ मनसे कार्यकर्त्यांनी परळीत राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसवर दगडफेक केली होती. खरे तर 2008 मध्ये रेल्वेत परप्रांतीय तरुणांच्या भरतीवरून राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने केली होती. अंबाजोगाईतही एसटी बसला लक्ष्य करण्यात आले.
 
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरे यांना अनेकदा न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र, राज ठाकरे एकाही सुनावणीला हजर राहिले नाहीत. जामीन मिळूनही सलग तारखांना हजर न राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती