शिवरायांचा सर्वात मोठा पुतळा उभारणा

शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (17:10 IST)
महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला हिंदवी स्वराज्य देणारे आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी केली आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सोनवणे बोलत होते. राज्यासह देशालाही गर्व वाटेल अशा आणखी 3 घोषणा 29 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
 
  जुन्नर तालुक्यामध्ये हा पुतळा उभारण्यासाठी २५ एकर जागेची निवड करण्यात आली असून त्याची खरेदी देखील झाली आहे. हातात तलवार असलेला शिवरायांचा हा पुतळा ब्रॉन्झ धातूमध्ये मुंबई येथे तयार करण्यात येणार असून त्यासाठी जे.जे स्कूल ऑफ आर्टस् या नामांकित संस्थेत काम करण्याचा अनुभव असणाऱ्या ज्येष्ठ शिल्पकाराची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण जगाला शिवरायांच्या या पुतळ्याची नोंद घ्यावी लागेल, असा हा पुतळा असेल असं यावेळी शरद सोनवणे म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती