NCP : राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी

शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (12:07 IST)
NCP: जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह पक्षातील काही आमदार आणि नेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शामिल झाले. अजित पवार एनसीपी पक्षातून बाहेर पडल्यामुळे एनसीपी मध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले. राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दोघेही आपला दावा सांगत आहे. 

अजित पवार यांनी पक्षातून दोन तृतीयांश आमदार आणि खासदार आपल्या सोबत आल्याने पक्ष आणि चिन्ह मिळावे असा दावा केला आहे तर या राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह त्यांचे असल्याचा युक्तिवाद शरद पवार गट करत आहे. 

या दोन्ही गटांचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापुढे आहे. त्यावर निर्णय 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दोन्ही गटाचे नेते पक्ष आणि चिन्ह आपल्यालाच मिळेल असा दावा करत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आपल्या विरोधात निर्णय लागल्यावर आयोगाने पक्षाचे चिन्ह गोठवल्यास गटाचे पर्यायी चिन्ह काय असावे या बाबत चाचपणी सुरु झाली असून तज्ञांची चर्चा सुरु आहे. आता 6 ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोग  काय निर्णय देते या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती