भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुळेंवर पलटवार केला आहे. सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं दुख: हे आहे की, या महाराष्ट्रात पवार कुटुंबीय सोडून सर्वात मोठं कुणी नाही. त्यांचे वडीलचं हे राज्यातले मुख्य आहेत. तेच राज्यामध्ये राजकीय बदल करू शकतात. याला छेद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पाठिंबा दिला. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने एका सर्वसामान्य मराठा कुटुंबातला एकनाथ शिंदे नावाचा एक चांगला चेहरा एक स्ट्रॉंग निर्णय घेणारा माणूस आहे आणि त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपद विराजमान केलं. हे सर्वात मोठं दुख: पवार कुटुंबियांचं आहे, असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पडळकर म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील फुटले होते. तेव्हा त्यांच्या मागे दोन आमदार ठामपणे उभे राहिले नाहीत. पण शिंदेंच्या मागे एकूण पन्नास आमदार ठामपणे उभे राहिले. त्यामुळे यांचं पोटातलं दुखणं हे वेगळं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतक्या चांगल्या प्रकारे काम करत आहेत. ते त्यांना सहन होत नाहीये.