काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी रविवारी जम्मूतील सैनिक कॉलनीत एका जाहीर सभेला संबोधित केले. काँग्रेस सोडल्यानंतर आझाद यांची जम्मूतील ही पहिलीच जाहीर सभा आहे.आज सकाळी दिल्लीहून जम्मूमध्ये आल्यावर आझाद यांचे भव्य स्वागत करण्यात आले आणि ते मिरवणुकीत सैनिक कॉलनीतील जाहीर सभेच्या ठिकाणी पोहोचले.
यावेळी त्यांनी काँग्रेस हायकमांडवर जोरदार निशाणा साधला.आझाद म्हणाले की, काँग्रेस आमच्या रक्ताने बनली आहे, संगणक आणि ट्विटरने नाही.“जे लोक आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना फक्त ट्विटर, कॉम्प्युटर आणि एसएमएसवर प्रवेश आहे.त्यामुळे काँग्रेस मैदानातून गायब झाली आहे.
काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते आझाद म्हणाले की त्यांच्या पक्षाचे नाव अद्याप ठरलेले नाही.ते म्हणाले, 'मी अद्याप माझ्या पक्षाचे नाव निश्चित केलेले नाही.जम्मू-काश्मीरमधील जनता पक्षाचे नाव आणि झेंडा ठरवतील. प्रत्येकाला समजेल असे हिंदुस्थानी नाव मी माझ्या पक्षाला देईन.असे त्यांनी जाहीर केले.