मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील एका कारखान्यात रविवारी लागलेल्या भीषण आगीत तीन महिला आणि एका मुलासह आठ जणांचा मृत्यू झाला. आग विझवण्याचा प्रयत्न करताना तीन अग्निशमन कर्मचारी जखमी झाले. रात्री ८ वाजेपर्यंत आग आटोक्यात आली. तसेच आग विझवण्यासाठी १०० पाण्याचे टँकर आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोलापूर एमआयडीसीमधील अक्कलकोट रोडवरील सेंट्रल टेक्सटाईल मिल्समध्ये पहाटे लागलेल्या आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.#WATCH | Maharashtra | Fire broke out at a factory located in the MIDC area in Maharashtra's Solapur. Fire tenders are present at the spot. More details awaited. pic.twitter.com/cqE4YJGQKY
— ANI (@ANI) May 18, 2025
तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.सोलापूरमध्ये अक्कलकोट मार्गावर एका टेक्सटाईल युनिटला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 18, 2025
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे…