प्रशासनाने लागलीच भरली समृद्धि महामार्गावरील 50 फुट लांब भेग, करोडोंच्या किंमतीवर बनला आहे 701 KM लांब हायवे

शुक्रवार, 12 जुलै 2024 (10:38 IST)
समृद्धि हायवेमध्ये भेग पाहवयास मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर वरून जाणारा समृद्धि महामार्गच्या माळीवाडा इंटरचेंज वर 50-100 मीटर दूर पर्यंत रस्त्यावर भेग पडली आहे. 
 
महाराष्ट्र सरकारची ड्रीम प्रोजेक्ट मानला जाणारा समृद्धि हायवेमध्ये भेग पाहवयास मिळाली आहे. या भेग चा व्हिडीओ वायरल झाला असून लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.  
 
701 किलोमीटर लांब समृद्धि प्रोजेक्टसाठी सरकार ने करोडो रुपये खर्च केले आहे. आता समृद्धि हायवेमध्ये भेग पाहवयास मिळत आहे. छत्रपति संभाजीनगर मधून जाणारा समृद्धि महामार्गच्या माळीवाडा इंटरचेंज वर 50-100 मीटर पर्यंत रस्त्यावर भेग पडली आहे. 
 
समृद्धि महामार्ग महाराष्ट्राच्या 10 जिल्ह्यांमधील 392 गावं वरून जातो. राज्यातील दहा जिल्ह्यातून जाणारा हा हायवे14 इतर जिल्ह्यांना जोडतो. महाराष्ट्राचे प्रमुख पर्यटन स्थळ शिर्डी , बीबी का मकबरा, सुला वाइनयार्ड्स, त्र्यंबकेश्वर शिव मंदिर, तानसा वन्यजीव अभयारण्य, पेंच राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा अंधारी टाइगर रिजर्व देखील या हायवेजवळ आहे.  
 
परिवहन मंडळाकडून सांगण्यात आले आहे की, मुंबई कडून येणारी  छत्रपती संभाजीनगर जवळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि राजमार्ग वर आलेल्या या भेगा लागलीच भरण्यात आल्या आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती