आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय कीटक आणि जलजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अहवालानुसार, 1 जानेवारी ते 31 मे 2025 दरम्यान राज्यात एकूण 183 स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले. त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर 1 जून ते 7 ऑगस्ट दरम्यान या आजाराचे 440 रुग्ण आढळले.