राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान महिला पदाधिकारी म्हणाल्या की जेव्हा मोर्चे, कार्यक्रम किंवा दौरे असतात तेव्हा आम्हाला विचारात घेतलं जात नाही, ही तक्रार ऐकल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मोठा निर्णय घेतला. त्या म्हणाल्या की, यापुढे महिला माझ्या गाडीत बसतील आणि माझ्या कार्यक्रमात प्रामुख्यानं महिलांचा सहभाग असेल, असा थेट निर्णय सुप्रिया सुळे यांनी घेतला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, येत्या काळात दोन महत्त्वाच्या निवडणुका आहेत. त्यामुळे पुढील बारा महिने आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. राज्याची सध्याची परिस्थिती गंबीर आहे. एक काळ असा होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीला गेला की काहीतरी भूंकप होणार अशी चर्चा असायच. आताचे मुख्यमंत्री दिल्लीत गेले की पालकमंत्री ठरतात. असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कंत्राटी नोकरभरती जी केली जात आहे. ती बंद करायला हवी, त्यासाठी रस्त्त्यावर उतरावं लागणार. कारण कंत्राटी भरतीत आरक्षण नसतं आणि कंत्राटी भरती करून या सरकारला आरक्षण रद्द करायचं आहे, त्यामुळे असं राष्ट्रवादी होऊ देणार नाही.
त्या पुढे म्हणाल्या की, राज्यातील ज्या शाळा बंद केल्या जात आहेत, त्या पुन्हा सुरू करू. तसंच, महिला सुरक्षितता हा विषय गांभीर्यानं घ्यायला हवा. त्यावरही आमचा पक्ष काम करणार. तसंच एकल महिलांसाठीही योजना राबवली जाणार असल्याचं, सुळेंनी यावेळी स्पष्ट केलं.