सनबर्न फेस्टिव्हलला हिंदू जनजागृती समिती आणि सनातनचा विरोध

मंगळवार, 27 डिसेंबर 2016 (16:57 IST)
येत्या ३१ डिसेंबरसाठी पुण्याजवळ होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलला हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेने विरोध केला आहे. सनबर्नमुळे महाराष्ट्राची संस्कृती धोक्यात येईल, असा सनातनचा दावा आहे. दुसऱ्या बाजूला राज्याचे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावळ यांनी पत्रकार परिषद घेऊन सनबर्नला सरकारचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे.
 
संगीत, मनोरंजन, गाणी, खाद्ययात्रा, शॉपिंग यांनी भरलेला सनबर्न फेस्टिव्हल हा 28 ते 31 डिसेंबरच्या दरम्यान पुणे-नगर रस्त्यावरील केसनंद येथे होणार आहे. देशातील आघाडीचे गायक आणि डीजे आर्टिस्ट यांच्या लाईव्ह परफॉर्मन्समुळे तरुणाईमध्ये सनबर्नच मोठं आकर्षण आहे. मागील नऊ वर्षे सनबर्न गोव्यामध्ये आयोजित होत होता. त्यादरम्यान सनबर्नने कर चुकवल्याचा आरोप सनातनने केला आहे. त्याचबरोबर सनबर्नमध्ये अमली पदार्थांचा वापर होत असल्याचंही सनातन संस्थेचं म्हणणं आहे.

वेबदुनिया वर वाचा