लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ते श्रीनगरला जाणार असल्याने त्यांची ही भेटही खास आहे. पीएम मोदी दोन दिवस श्रीनगरमध्ये राहणार आहेत. 20 जून रोजी संध्याकाळी ते श्रीनगरला पोहोचतील. येथे ते सायंकाळी 6 वाजता श्रीनगरमध्ये युवा सक्षमीकरणावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. याशिवाय दुसऱ्या दिवशी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त PM मोदी सकाळी 6.30 वाजता सकाळच्या योगासन कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जाधव म्हणाले की,योग अंतर्मन आणि बाह्य जग यांच्यातील संबंधाचा विस्तार अधोरेखित करतो.योगामुळे सामाजिक समरसता वाढवताना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकास होतो.