'अशा' रूग्णांची झिका व्हायरससाठी चाचणी करण्यात येणार

बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (16:06 IST)
ताप आलेल्या रूग्णांमध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनिया यासारख्या आजारांमध्ये ज्या रूग्णांची चाचणी ही निगेटिव्ह येईल अशा रूग्णांची झिका व्हायरससाठी चाचणी करण्यात येणार आहे. तसेच या रूग्णांचे सातत्याने निरीक्षणही करण्यात येणार आहे. या रूग्णांच्या माध्यमातून नवनवीन व्हायरल इन्फेक्शनची प्रकरणे समोर येत नाहीत ना ? याबाबतची तपासणी करण्यात येईल.राज्यातील प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. राज्यात सध्या झिका व्हायरस ट्रॅक करण्यासाठी एकुण ५७ प्रयोगशाळांचे नेटवर्क सज्ज आहे. 
 
महाराष्ट्रातील प्रयोगशाळांमध्ये इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नागपूर),कस्तुरबा हॉस्पिटल (मुंबई) आणि हाफकीन इन्स्टिट्यूट (मुंबई) या ठिकाणांचा समावेश आहे.तर आणखी तीन शासकीय प्रयोगशाळांची नेमणुक झिका व्हायरसच्या प्रयोगशाळेसाठी होणार आहे.तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) ची नेमणुक झिका व्हायरस चाचणीसाठी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात डेंग्यू, चिकुनगुनिया यासारख्या आजारांमध्ये निगेटीव्ह येणाऱ्या रूग्णांची तपासणी झिका व्हायरससाठी करण्यात येणार आहे. नियमित आजारांच्या चाचण्यांसोबत या प्रयोगशाळांमध्ये झिका व्हायरससाठीची चाचणी होणार आहे. 

डासांमधील एडिस जातीच्या डासांपासून झिका व्हायरसचा संसर्ग होतो. तसेच डेंग्यू आणि चिकुनगुनिया व्हायरसच्या माध्यमातूनही हा आजार पसरतो. म्हणूनच झिकाचा संसर्ग तपासण्यासाठी आता डेंग्यू आणि चिकुनगुनिया टेस्ट निगेटिव्ह आलेल्यांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. तसेच झिकाची लक्षणे असणाऱ्या रूग्णांच्याही चाचण्या करण्यात येणार आहेत. भारतात झिका व्हायरसची चाचणी करण्यासाठी केंद्रातील इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चची दिल्ली स्थित नॅशनल सेंटर फॉर डिझिज कंट्रोल (NCDC) आणि पुणेस्थित नॅशनल इन्स्टिस्ट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यासारख्या संस्था मुख्यत्वेकरून झिकाच्या संसर्गावर लक्ष ठेवून आहेत. झिकाची चाचणी करण्यासाठी RTPCR चाचणी करण्यात येते. सध्या झिकाची चाचणी ही कर्मशिअल तत्वावर खाजगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती