भाजप २५ लाख युवा वॉरियर्स नेमणार

बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (15:49 IST)
भाजपकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे.भाजपने मागील विधानसभा निवडणूकीत वन बुथ १० युथ अभियान राबवले होते यामध्ये भाजपला चांगले यशही मिळालं होतं. मात्र आता एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात युवांना भाजपमध्ये सामील करण्याची मोहिम आखली आहे. २५ लाख युवा तरुणांना यामध्ये सहभागी करण्याचे लक्ष असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. २५ लाख युवा वॉरियर्स नेमणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.
 
भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये २५ लाख युवा वॉरियर्स नेमणार असल्याची माहिती दिली आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहेकी, भाजपची तयारी नेहमीच सुरु असते परंतू १८ ते २५ वयोगटाचा युवा वॉरियर्स तयार करण्याचे अभियान आम्ही घेतलेलं आहे.हे अभियान यशस्वी होणार आहे.मी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर सात दिवस होतो.तसेच पुण्याचाही दौरा केला आहे.जनतेमध्ये राज्य सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही काम केलं आहे त्याबद्दल नागरिकांना आपुलकी आहे.असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती