मुख्यमंऱ्यांनी दिलेला शब्द फिरवला :शेलार

बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (16:03 IST)
राज्य सरकारने पूरग्रस्तांना दिलेलं पॅकेज हे वर्तमानपत्रातील प्रसिद्धीची बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करू असं सांगितले होतं. मात्र, त्यांनी पॅकेज घोषित केल्यानं मुख्यमंऱ्यांनी दिलेला शब्द फिरवला आहे. त्यांनी शब्द पाळून पूरग्रस्तांना योग्य ती मदत करावी,असा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. शेलार धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 
 
तसंच मुंबईच्या विमानतळाच्या नावाबाबत विचारलं असता शेलार म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे नाव कुणीही हटवू शकत नाही. ते नाव भाजपच्या काळातच दिलं गेलं आहे.त्याचा ठराव राज्य सरकारने पारीत केला आहे. अदानीचा ठराव पारीत करून राज्य सरकारने अदानीला छत्रपती शिवरायांचे नाव झाकन्याची संधी दिली आहे का? असा सवालही शेलार यांनी केलाय. तसंच नवाब मलिक हे अदानीचे जवळचे मित्र आहेत. त्यांनी हिंमत असेल तर ठराव रद्द करावा, असं आव्हानच शेलार यांनी राज्य सरकारला दिलंय.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती