चंद्रपूर : खरंतर ब्लॅकगोल्ड सिटी ही चंद्रपूरची खरी ओळख आहे. आता याच चंद्रपुरात रंगीत कापसाच्या वाणाच्या निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात पांढ-या कापसासोबतच रंगीत कापूस सुद्धा येथे दिसणार आहे.
वरोरा तालुक्यातील एकार्जुना येथील कृषी संशोधन केंद्रात प्रथमच रंगीत कापसाची लागवड करण्यात आली. हा रंगीत कापूस चांगलाच बहरला. तो बघण्यासाठी शेतक-यांची गर्दी होत आहे.
पांढ-या कापसापेक्षा रंगीत कापसाचे उत्पादन भरघोस होते. शिवाय मशागतीचा खर्चही कमी आहे. एकाजुर्ना कृषी संशोधन केंद्रात कापसाच्या ३ रंगीत वाणांच्या कपाशीची लागवड करण्यात आली. त्यात नॉनबीटी आणि बीटी कपाशीचा समावेश आहे. येथे बहरलेल्या रंगीत कापसाच्या झाडाला 50 ते 60 बोंडे लागली आहेत.
वैदेही, सीएनएच 17395 हे दोन वाण अमेरिकन कॉटन प्रकारातील आहेत. सीएनएच 17552 हे देशी वाण आहेत. या वाणाच्या झाडांना 50 ते 60 बोंडे लागतात. पुढल्या वर्षी या कापसाचे बियाणे शेतक-यांना उपलब्ध होणार आहे. 17552 हे फिक्कट पिवळसर रंगाचे वाण आहे.