सोमवारी राज्यामध्ये कोरोनाच्या 2 हजार 728 चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी आरटीपीसीआर चाचण्या 1 हजार 423 इतक्या झाल्या तर आरएटी चाचण्या 1 हजार 305 झाल्या. राज्यात सोमवारचा पॉझिटिव्हीटी दर 2.23 टक्के इतका आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहतीनुसार, सध्या राज्यामध्ये जेएन.1 व्हेरिएंटचे 250 रुग्ण आहेत. यामध्ये पुण्यात सर्वाधिक 150 रुग्ण आहेत. त्याखालोखाल नागपूर 30, मुंबई 22, सोलापूर 9, सांगली आणि ठाणे प्रत्येकी 7 रुग्ण आहेत. इतर जिल्ह्यात कमी प्रमाणात रुग्णसंख्या आहे.