छत्रपती संभाजी नगर: चिक्कू दाबला आणि वाद पेटला

सोमवार, 8 जानेवारी 2024 (15:26 IST)
एका फळ विक्रेत्याचे आणि ग्राहकांचे वाद झाले.आणि वादाचे हाणामारीत रूपांतरण झाले. किरकोळ कारणावरुन वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना पैठण तालुक्यात बिडकीन गावात छत्रपती संभाजी नगर येथे घडली आहे. रईस शेख बाबू वय वर्ष 33 या व्यक्ती ने बिडकीन पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. रईस नावाच्या या व्यक्तीचे फळाचा गाडा असून कृष्णावाघ  नावाचा व्यक्ती तिथे आला आणि त्याने चिक्कू दाबून पाहण्यास सुरु केले .

त्यावेळी  दाबल्याने एक चिक्कू फुटला. चिक्कू फोडू नका असे  रईसच्या भाच्याने त्याला सांगितले. या वरून कृष्ण आणि भाच्यांमध्ये वाद झाला. आणि वाद विकोपाला जाऊन हाणामारी झाली. या हाणामारीत रईसचा भाचा जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. या वरून वाद चिघळला आणि दोन्ही गटात दगडफेक झाली आणि एकाने वस्तरा आणून दुसऱ्यावर वार केल्याने तो जखमी झाला.

या हाणामारीत पाच ते सहा जण जखमी झाले असून पोलिसांना या राडाची माहिती मिळाली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जमावाला पांगवले. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही गटांच्या 17 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या प्रकाराची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती