नाशिक शहरात डोळ्यांची साथ कायम असून, मंगळवारी दिवसभरात तब्बल 300 रुग्णांची नोंद झाली आहे.
डोळ्यांच्या रुग्णांत सातत्याने वाढ होत असल्याने महापालिका यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आली आहे.
गेल्या पाच दिवसापासून डोळ्यांच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालय, बिटको रुग्णालय, डॉक्टर झाकिर हुसेन रुग्णालय, तसेच इंदिरा गांधी रुग्णालयाच्या अहवालानुसार मंगळवारी तीनशे रुग्णाची नोंद झाली आहे. 27 जुलैला शहरात 144, तर 28 जुलैला 156 रुग्णांची नोंद झाली होती. 29 जुलैला 179, तर 30 जुलैला 256 डोळ्याचे रुग्ण होते. 1 ऑगस्टला तब्बल 300 रुग्णांची नोंद झाली आहे.