महागाईच्या विरोधात 31 मार्च पासून काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

रविवार, 27 मार्च 2022 (16:58 IST)
वाढत्या महागाईच्या विरोधात येत्या 31 मार्च पासून राज्यभरात 'महागाईमुक्त भारत' आंदोलन सप्ताह आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. 
 
वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्य माणसाला बसत आहे. या महागाईच्या विरोधात केंद्र सरकारला जागे करण्यासाठी येत्या 31 मार्चला काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. जेणे करून झोपलेल्या केंद्रसरकारला जाग यावी. मुंबईत टिळक भवनात एका पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी ही माहिती दिली. 
 
सध्या भाजपचा कारभार निवडणुकीच्या काळात जनतेचा रोष मिळू नये या साठी इंधन वाढ रोखण्यात आली मात्र निवडणुका झाल्यावर भाजपने इंधन वाढ केली. एलपीजी गॅसचे दर 50 रुपयांनी वाढले, इंधनाचे दर, दुधाचे दर , औषधाचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे. या बद्दल केंद्र सरकारला काहीच वाटत नाही.

सर्वसामान्य माणसाचे हाल होत असताना केंद्र सरकार झोपली आहे. या सरकारला जागे  करण्यासाठी 31 मार्च रोजी काँग्रेसचे कार्यकर्ते महागाई विरोधात आंदोलन करतील. तर 2 ते 4 एप्रिल रोजी सर्व जिल्हा मुख्यालयात तर 7 एप्रिल रोजी राख्या मुख्यालयात मुंबईत महागाई मुक्त भारत धरणे आंदोलन आणि मोर्चे करण्यात येतील. या आंदोलनात काँग्रेचे सर्व नेते आणि खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याची माहिती नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती