लग्नाआधीच उच्च शिक्षित तरुणीची आत्महत्या

रविवार, 27 मार्च 2022 (12:17 IST)
साखरपुडा झाल्यानंर मुलगी लग्नासाठीचे नवीन स्वप्न पाहू लागते. त्यासाठी ती आनंदी असते. पण लग्नापूर्वीच सासरच्या माणसांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका उच्च शिक्षित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव मध्ये घडली आहे. रामेश्वरी रवींद्र नागपुरे रा.कुऱ्हे पानाचे असे या मयत तरुणीचे नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वरी हिचे लग्न रावेरच्या भूषणशी ठरले होते. या दोघांचा साखरपुडा 6 मार्च रोजी थाटामाटात झाला होता. त्यांचा विवाह 18 मे रोजी करण्याचे योजिले होते. या लग्नात हुंडा म्हणून तीन तोळे सोनं आणि 50 हजार रुपये रोख देण्याचे ठरले होते. 
 
साखरपुडा झाल्यानंतर काहीच दिवसांनी भूषण आणि त्याच्या आईकडून दागिने आणि पैशांची मागणी सुरु झाली. तू जाड आहेस मला आवडत नाही 'मी मामाच्या सांगण्यावरून तुला होकार दिला, मी हे लग्न मोडेन लग्न कुऱ्हे गावात नाही तर भुसावळला लॉनवर करा.ते अजून पैशाची मागणी करू लागले. भूषण रामेश्वरीला जाड असल्यामुळे तिला हिणवायचा.सासरच्या लग्नापूर्वीच सासरच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 
 
मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी नवऱ्या मुलावर आणि त्याच्या कुटुंबियांच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून जो पर्यंत सासरच्या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येत नाही तो पर्यंत आम्ही मुलीवर अंत्यसंस्कार करणार नाही.  असे ठामपणे सांगितले.  भुसावळ तालुका पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांना गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यांनतर तरुणीचा पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती