पुण्यश्लोका अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकावरून राष्ट्रवादी - भाजपात वाद

रविवार, 27 मार्च 2022 (14:20 IST)
सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात महानगर पालिकांच्या वतीने विजयनगर या ठिकाणी पुण्यश्लोका अहिल्याबाई होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या उदघाटनाला घेऊन आता राष्ट्रवादी आणि भाजपचा वाद आता पेटला आहे.

राष्ट्रवादीने येत्या 2 एप्रिल रोजी पुण्यश्लोका अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे. तर  उद्दघाटनाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील अरब भाजप नेत्यांची बैठक घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हा उदघाटन सोहळा 27 मार्च रोजी धनगर समाजातील मेंढपाळ्याच्या हस्ते उदघाटन करण्याचं जाहीर केलं आहे. या वरून राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. या संघर्षामुळे सांगलीत जिल्हा प्रशासनाने स्मारकाच्या ठिकाणी 25 मार्च मध्यरात्री पासून दोन एप्रिल पर्यंत संचार बंदी लागू केली आहे. या परिसरात 2 एप्रिल रात्री 10 वाजे पर्यंत कलम 144 लागू असल्यामुळे जमावाने या ठिकाणी फिरू नये अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस करून उदघाटन सोहळ्याला भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्याला निमंत्रण देण्यात आले नाही. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर बांधवाच्या हस्ते सायंकाळी 4 वाजता उदघाटन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्शवभूमीवर या परिसरात संचार बंदी लागू असताना उदघाटन सोहळा होणार का ?या कडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती