कोरोना रोखण्यात राज्य सरकार सपशेल फेल ठरले असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. कोरोनामुळे राज्याची परिस्थिती वाईट होत चालली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन परिस्थिती पुर्वपदावर आणावी असे दरेकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
केंद्र सरकारला, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला, गृह विभागाला, आर्थिक आणि कृषी विभागाल विनंती करतो की महाराष्ट्राच्या परिस्थितीकडे लक्ष घालावे अशी विनंती करतो, कारण या सरकारचे आता सर्वसामान्य आणि महाराष्ट्राकडे लक्ष राहिलेलं नाही त्यांना फक्त सत्ता टिकवणे हेच लक्ष बनले आहे. म्हणून जनतेकडे लक्ष नसल्याने केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणावे अशी विनंती असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.