एसटी आंदोलक मैदानातून बाहेर

शनिवार, 9 एप्रिल 2022 (10:04 IST)
आझाद मैदान येथील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी मध्यरात्री  कारवाई करत त्यांना बाहेर काढले असून यामधील 5 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी स्थानकात घोषणाबाजी सुरू केली आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावरून गेल्या पाच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केल्यानंतर मुंबई पोलिसांनी  एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदान खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी बाहेर निघण्यास नकार दिला होता. वकील गुणरत्न सदावर्ते सांगतील तो पर्यंत आम्ही बाहेर जाणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली होती.

मात्र मध्यरात्री पोलिसांनी कारवाई करत 250 कर्मचाऱ्यांना बाहेर काढले असून यामधील 5 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आझाद मैदानातून बाहेर काढल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात बसून ठिय्या देण्यास सुरुवात केली आहे. शेकडो कर्मचारी सीएसएमटी स्थानकात बसून सरकारविरोधात घोषणाबाजी देत आहेत. याठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती